Monday, September 26, 2022

भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस विक्रीला ब्रेक

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisement -

जळगाव:  सध्या कापसाला बाजारात ८ हजार रुपये प्रति किंट्टल भाव मिळत आहे; मात्र आगामी काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता असल्यमुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला ब्रेक लावला आहे. कापसाचे भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात पूर परिस्थिती तसेच सततच्या पावसाने कापसाची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कापसाच्या भावातही तेजी आली आहे. यंदा कापसाचे झालेले कमी उत्पादन व अचानक वाढलेल्या मागणीने कापसाच्या भावात तेजी आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला प्रचंड मागणी असली तरी त्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने खासगी व्यापाण्यामध्ये च शेतकऱ्यांच्या कापसाला भाव देण्यावरून स्पर्धा सुरु असल्याचे बाजारात दिसून येत आहे. सध्या आठ हजारांच्या आसपास कापसाचे भाव पोहोचले असल्याने, येत्या काही दिवसांत भावात तेजी पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आंतर राष्ट्रीय बाजार पेठेत कापसाला मागणी वाढल्याने भावात तेजी आली आहे. येत्या काही दिवसांत भावात तेजी येऊन त्याचा भाव १० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता व्यापारीवर्गात व्यक्त करण्यात येत आहे.

कापूस लागवडीचा खर्च जास्त असल्यामुळे  कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न परवडत नव्हते, परंतु यावर्षी मिळालेल्या भावामुळे कापूस उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळाला. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी कपाशी उपटून फेकली व खरिपाचा हंगामच आला नसल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे कपाशीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कापूस खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे खरेदीत चांगलीच स्पर्धा आली. ही . स्पर्धा शेतक-यांच्या फायद्याची ठरत आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातील कापूस सरळ घरी साठवून ठेवला त्यामुळे भाव वाढीच्या आशेने कापूस शेतकऱ्यांनी दाबून ठेवल्याचे दिसत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या