वृक्ष संवर्धनासाठी महिला समितीतर्फे 100 पुस्तकांचे वाटप

भुसावळ :- शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. यासाठी जनजागृती करून वृक्षलागवड वाढवण्यासाठी वृक्षांचे महत्व , सांगणा-या पुस्तकांचे नागरिकांना वाटप केले. पावसाळ्यात नियोजन करून लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यावर भर राहील तसेच भावी पिढीसाठी आतापासूनच पर्यावरण संवर्धन करणें गरजेचे असल्याची माहिती अध्यक्षा रुपाली सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.
येथील महिला वृक्षारोपण समितीतर्फे शांतीनगर , तापीनगर , गणेश कॉलनी , रोटरी क्लब परिसरात रविवारी पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवड विषयांवरील १०० पुस्तक वाटप करून नागरिकांना वृक्षांचे संवर्धन , जतन आणि उपाययोजनांची माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले. शहरातील हरित पट्टा अविकसित असल्याने तापमानात वाढ होउन पर्जन्यमान घेतात आहे या संताबाबत नागरिकांना जागृत करण्यासाठी समितीने सुटीचा वार साधून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनावर आधारित १०० पुस्तकांचे वाटप केले. या पुस्तिकेत झाडे लावण्याचे महत्व, त्यांचे फायदे , वृक्षतोडीचे दुष्परिणाम , आदींबाबत सविस्तर माहिती दिली आहे . शहरात अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी या अनुषंगाने आतापासूनच जनजागृतीवर भर दिला आहे, यावेळी समितीच्या अध्यक्षा सौ रुपाली सूर्यवंशी, उपाध्यक्षा वंदना झांबरे , सचिव माया चौधरी , प्रसिद्धी प्रमुख राजश्री नेवे, अंजली नेवे, नीलिमा चौधरी, मनीषा वानखेडे, राधिका वाणी, आदींसह सदस्य उपस्थित होते.

