भावासोबत झोका खेळताना दहा वर्षीय चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू

0

नाशिक:- घरात भावांसोबत झोका खेळताना दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या अंबड भागातील चुंचाळे अश्विन नगरच्या म्हाडा कॉलोनीत घडली आहे.

निखिल निंबा सैंदाणे असे या मयत चिमुकल्याचं नाव आहे. घरातील छताच्या लोखण्डी हुकला लावलेल्या झोक्याच्या दोरीचा गळफास लागून निखिलचा मृत्यू झाला. निखिल आपल्या घरी लहान भावांसोबत झोका खेळत होता. त्याचे वडील कामावर गेले होते. आई शेजारी काही कामानिमित्त गेली होती. निखिलने पलंगावरून झोका खेळायला सुरु केले. झोका गोल गोल फिरवत असताना झोक्याची दोरी त्याच्या गळाला आवळली.आणि तो खाली पडला

त्याला खाली पडलेलं पाहून लहान भाऊ धावत आईकडे गेला आणि त्याने आईला निखिल खाली पडल्याचे सांगितले. तो काही बोलतच नाही असे त्याने आईला सांगितले. आईने तातडीनं घराकडे धाव घेतली आणि तिने निखिलला निपचित पडलेले पहिले. आईने गळ्यात अडकलेली दोरी कापून त्याला उठविले मात्र तो पर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता.आईने हे पाहून टाहो फोडला. तिचे ओरडणं ऐकून शेजारच्यांने त्याला तातडीनं रुग्णालयात नेले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.पोलिसांनी या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.