खामगांव : तालुक्यातील भालेगांव बाजार येथे रविवारी सकाळी 9 वाजता भाजी विकणार्या शेतकर्यांवर पिपळगांव राजा पोलीसाची वक्रदूष्टी पडली. भाजी विक्रेताच्या शेतकर्याना चक्क ,घोडी बनवित दंदात्मक कारवाई केली,तर काही शतकर्याना मारहाणही करण्यात आली.
जीवनावश्यक वस्तु विक्रीच्या वेळेत शेतकरी भाजी विकी करीत असतानाही पोलीसानी कारवाई केल्यामुळे पोलीसाच्या या कारवाईबद्दल प्रश्रचिन्ह उपस्थित केले जात आहे कोरोना या विषाणुच्या अनुषंगाने सुरु असलेल्या संचारबंदीत जीवनावश्क वस्तुची विक्री करण्यासाठी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यत जिल्हाधिकार्यानी मुभा दिली आहे. माञ असे असतानाही पिपळगांव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भालेगांव बाजार येथे सकाळी 9 वाजता पोलीसांकडुन शेतकर्याना मारहाण करण्यात आली.तर काही भाजी विकेत्या शेतकर्यांना चक्क पोलीसांनी घौडी बनविले. पोलीसाच्या या कारवाईमुळे शेतकर्यांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहे.