Sunday, November 27, 2022

भारिप व झोपडपट्टीधारकांचा खासदार व आमदारांना घेराव

- Advertisement -

- Advertisement -

भुसावळ –

- Advertisement -

- Advertisement -

या भागाचे खा. रक्षाताई खडसे व आ. संजय सावकारे यांनी गत दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या अतिक्रमण मोहिमेकडे दुर्लक्ष केले.या भागातील विस्थापीत झालेल्या नागरिकांचे होणारे हाल त्यांनी येवून बघायला पाहिजे होते. बरेच दिवसांपासुन हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपण त्यावर आजपर्यंत उपाययोजना का केली नाही यासह अनेक प्रश्नांचा भडीमार रेल्वे अतिक्रमीत भागातील नागरिक व भारिप पदाधिका-यांनी खासदार आमदार व नगराध्यक्षांना विचारुन त्यांना भंडावून सोडले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने लागलीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

शहरातील यावल रोडवरील शासकीय विश्रामगृहात आज १७ रोजी बहिणाबाई महोत्सवाचे आयोजनाविषयी पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती. बैठकीत खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.  पत्रकार परिषद सुरु असतांनाच मध्येच रेल्वे प्रशासनाच्यावतीने काढण्यात आलेल्या अतिक्रमीत भागातील झोपडपट्टीधारकांनी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीत प्रवेश करीत खा. रक्षा खडसे व आ. सावकारे यांना पुर्नवसनाबाबत काय अशी विचारणा केली. प्रसंगी या भागातील महिला आक्रमक झालेल्या दिसून आल्या. आपली व्यथा मांडतांना काहींच्या डोळयात अश्रू आले होते. आपली मुले गत दोन दिवसांपासून उघड्यावर आहेत. आपण काहीतरी करा अशी आर्जवाची विनवणी करतांना नागरिक दिसत होते. लोकप्रतिनिधींनी अतिक्रमण मोहिमेकडे पाठ फिरविली असा आरोप करीत आपण याकडे लक्ष दयावयास पाहिजे होते. आमचा संसार उघडयावर आला असून आपणांस काही दया – माया आहे की नाही असे खडे बोल त्यांना सुनावले. यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते.तात्काळ पोनी.बाबासाहेब ठोंबे, देविदास पवार, रामकृष्ण कुंभार,सपोनी दिपक गंधाले यांच्यासह कर्मचारी दाखल झाले व परिस्थिती आटोक्यात आणली.

· जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करणार

अतिक्रमीत भागातील नागरिकांविषयी आम्हास सहानभुती असून हा रेल्वे अखत्यारितील प्रश्न असल्यामुळे त्याबाबत काही करु शकत नाही. मात्र, या भागातील खरोखर जे गरजु असतील त्यांचे पुर्नवसन व्हावे अशी आमची भुमिका असून आजच याबाबत जिल्हाधिका-यांकडील बैठकीत हा प्रश्न मांडणार असल्याचे खा. खडसे,आ.सावकारे यांनी यावेळी सांगितले.

· गरजु लोकांची यादी तयार करावी – आ. संजय सावकारे

झोपडपट्टीधारकांच्या वतीने सहभाग घेतलेल्या भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा सोनवणे यांच्याशी चर्चा करतांना आ. सावकारे यांनी सांगितले की, आपण कोणाचाही राजकीय हस्तक्षेप न घेता खरोखर जे गरजु असतील त्यांची यादी बनवावी व यादी प्रशासनाला दिल्यास त्यांच्यासाठी जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करु.  तसेच शहरातील व शहराबाहेर काही खुले भुखंड असतील तेथे आपण पुर्नवसनाबाबत चर्चा करुन हा प्रश्न सुटू शकतो. मात्र, यासाठी काही काळ वेळ द्यावा लागेल. असे आश्वासन दिले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या