जळगांव:- भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून आज असंख्य कार्यकर्त्यांनी भारिप बहुजन महासंघात जेष्ठ कार्यकर्ते श्री.पारेराव यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला .
शनिवार ५ रोजी अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी धुळ्यातील भारिप बहुजन महासंघाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.पारेराव हे होते.तर जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,जिल्हा नेते गमिर शेख,जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे आदींची यावेळी उपस्थिती होती.
——-यांनी केला प्रवेश ——
जिल्ह्यतील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रमोद इंगळे यांच्यासह गौतम रवींद्र सोनवणे,भीमराव सोनवणे,गणेश महाले,गणेश मेढे,मच्छीन्द्रनाथ सोनवणे,नितीन सोनवणे,जितेंद्र साळवे,विरुदेव हटकर,शालुबाई भालेराव,रजूबाई कोळी,मालुबाई बनसोडे,किशोर सपकाळे,रितेश सोनवणे,युवराज झाल्टे,खंडू महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यानी पक्ष प्रवेश केला.
जळगांव जिल्ह्यात आणखीही अनेक मान्यवर व विविध संस्था,संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी भारिप बहुजन महासंघात प्रवेश करणार असून लवकरच जळगांव येथे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गाव तिथे भारिप आणि घर तिथे कार्यकर्ता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली .