जळगांव:- कोरेगाव भीमा येथे जातीय हिंसाचार घडविण्यास कारणीभूत असलेल्या मनोहर कुलकर्णी तथा संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी व ऍट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा आदी मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.
केंद्र व राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,भारत ससाणे,दिनेश इखारे,संजय सुरळकर,अरुण तायडे,सलाउद्दीन शेख, गुरुनाथ सैंदाणे यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणा देत घंटानाद लक्ष वेधून घेतले.
आंदोलनकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.त्यात भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करावी, ऍट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आjaले.