जळगाव ;– येथील भारत विकास परिषदेतर्फे आदर्शनगरमधील विनायक हॉस्पिटल येथे आज मंगळवार दि.8 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
भारत विकास परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व उद्योजक रवींद्र लढ्ढा, तुषार तोतला, पुरुषोत्तम न्याती व डॉ.अमित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
प्रचंड उन्हाळा, वाढते अपघात त्यामुळे याकाळात रक्ताची मोठी गरज भासते तेव्हाच सुट्ट्या, विवाह सोहळा यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो. तो कमी व्हावा या उद्देशाने भारत विकास परिषदेने या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे अध्यक्ष प्रशांत महाजन यांनी सांगितले.
स्व.माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात भारत विकास परिषदेचे अध्यक्ष प्रशांत महाजन, श्रीहर्ष खाडिलकर, प्रा.रत्नाकर गोरे, तन्मय तोतला, हर्षल झंवर, विजय ब्राह्मणकर, देवेंद्र भावसार, डॉ.अमित चौधरी, राजू कोचर आदिंनी रक्तदान करुन सहभाग दिला.
शिबिराचे निययोजन व यशस्वीतेसाठी भारत विकास परिषदेच्या महिला समितीने विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी परिषदेच्या 45 सदस्यांची उपस्थिती होती.