भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय टेली कोलँबोरेशन प्रोजेक्टमध्ये ज्ञानेश्वर पाटील यांचा सहभाग

0

भातखंडे (प्रतिनिधी) : भारत आणि बांगलादेश आयोजित इको ट्रेनिंग सेंटर स्वीडन व नाशिक जिल्हा शिक्षक प्रशिक्षण  संस्था जिल्हा परिषद, जळगाव  महाराष्ट्र. गव्हर्मेंट  एलिमेंट्री टीचर्स फ्रॉम बांगलादेश गव्हर्मेंट, स्वयंसेवी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भारत व बांगलादेश या देशातील निवडक इंग्रजी शिक्षकांना  टेली कोलँबोरेशन प्रोग्राम मध्ये कै. श्रीमंत सौ. माणिकराजे  शिवराव पवार विश्वासराव  एज्युकेशनल अँड हिस्टॉरिकल ट्रस्ट नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव संचलित श्रीमंत डी. के. पवार माध्यमिक निंभोरी तालुका पाचोरा विद्यालयातील तंत्रस्नेही, तालुका चेस मॉडरेटर, इंग्रजी विषयाचे शिक्षक  ज्ञानेश्वर पाटील यांनी या निवडक शिक्षकांमध्ये सहभाग नोंदवला असून ते बांगलादेशातील  इंग्रजी विषयाच्या शिक्षिका इस्मत फरजाना यांच्यासमवेत  हा प्रकल्प  राबवत असून ते त्यांना उत्तम प्रकारे  माहिती देत आहे

आणि  प्रकल्पात  बांगलादेश आणि भारत  यातील  वरील सर्व  नमूद केलेल्या बाबी  ते जाणून अभ्यास करत आहेत. १५ सेशनचा  प्रोजेक्ट दोघां देशातील इंग्रजी विषयाचे शिक्षकांनी मिळून राबविला जात आहे. या प्रकल्पात चर्चा पद्धतीतून सादरीकरण करायचे आहे प्रथमता: प्री रजिस्ट्रेशन ,प्री अवेअरनेस टेस्ट, कुटुंब परिचय प्रकल्पाचा उद्देश, फेवरेट टाईम पास, तेथील दारिद्र्य, त्या प्रदेशातील अन्न, झिरो भुकेले, तेथील संस्कृती, चांगल्या आरोग्य सुविधे विषयी काय केले जात आहे, तेथील प्रदेशातील रहिवाशांचे जीवन कसे आहे, गुणवत्ता शिक्षण कसे आहे, तेथील प्राणी कोणते, गुणवत्ता शिक्षण कसे आहे, तेथील प्रांतरचना, तेथील सण-उत्सव, तेथील सोशल मीडिया, जेंडर इक्वलिटी विषयी, तेथील ऋतुमान कसे आहेत, स्वच्छ पाणी  आणि आरोग्य विषयी, तेथील सुट्ट्या व भेट देण्याची पद्धत,या साऱ्या गोष्टींचा  गोषवारा पूर्ण पंधरा सेशनचे मूल्यमापन अशा पद्धतीने  भारत आणि बांगलादेशचे  इंग्रजी विषयाचे शिक्षक यांच्यात माहितीचे आदानप्रदान केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय टेली कोलॅबोरेशन प्रोजेक्ट  ४५ मिनिटे  भारतीय  तसेच ४५ मिनिटे  बांगलादेशी शिक्षकाला अशा प्रकारचे नियोजनातून  एकमेकांना प्रश्न विचारून   दोन्ही देशांमधील वरील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्यात सातत विकासाचे लक्ष्य आहे. सदरचा प्रकल्प नाशिक जिल्हा डायटचे अधिव्याख्याता योगेश सोनवणे साहेब तसेच जळगाव जिल्ह्याचे इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ हे परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय टेली कोल्याबोरेशन प्रोजेक्टमध्ये सहभागाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वंदनाताई पवार, संस्थेचे सचिव अँडवोकेट योगेश जगन्नाथ पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ पवार सह तालुक्यातील सर्व इंग्रजी शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.