भारत-पाक क्रिकेट सामन्याचे युवाशक्तीतर्फे थेट प्रेक्षपण

0

जळगाव :- विश्वकप २०१९ अंतर्गत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रेक्षपण युवाशक्ती फौंडेशन व कौशिकी भारत गॅस यांच्या सयुंक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे दि.१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपासून सामना संपेपर्यंत एलसीडी प्रोजेक्टरवर दाखविण्यात येणार आहे. मॅचच्या ब्रेकमध्ये देशभक्तीपर गीत लावून नागरिकांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. येणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी बसण्याची विशेष व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आलेली आहे.

तरी जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमी नागरिकांनी एका ठिकाणी येवून क्रिकेट सामना पहावा व आनंद घ्यावा, या येतून सदर आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.