भारत चीन संघर्षात साताऱ्याचे जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण

0

सातारा |भारत चीन संघर्षात लेह लडाख सीमेवर महाराष्ट्रातील सातारा जिल्यातील जवान सचिन संभाजी जाधव हे हुतात्मा झाले आहेत.सचिन जाधव हे लेह लडाख सीमेवर 111 इंजिनिअरीग रेजिमेंट मध्ये कार्यरत असताना जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आले असल्याची माहिती सातारा जिल्हा सैनिक अधिकारी यांनी दिली आहे

हुतात्मा सचिन संभाजी जाधव हे लेहमध्ये कार्यरत हाेते. बुधवारी (ता.16) ते हुतात्मा झाले असून त्यांचे पार्थिव पुणे येथे आज (शुक्रवार) रात्री दहा वाजता आणण्यात येणार आहे. तेथून ते सातारा जिल्ह्यात आणले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.