चाळीसगाव (प्रतिनिधी )भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा खानदेश रक्षक ग्रुप व राजमुद्रा अॅकडमीतर्फे सत्कार करण्यात आला .
सविस्तर माहिती अशी की राजमुद्रा अकॅडेमी ने चाळीसगाव येथे MPSC,पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण केंद्र चालू केले असून या अकॅडेमीच्या वतीने मागील वर्षी सैन्य दलात निवड झालेल्या 10 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर खान्देश रक्षक गृप चे पदाधिकारी मा. प्रवीण महाजन साहेब विठ्ठल सावंत सर पीए पाटील सर, उल्हास पाटील सर, आभिमंन्यू जाधव चाळीसगाव ता.पंत्रकार संघाचे आध्यक्ष आर डी बापू चौधरी, प्राईम फोकस रिपोर्टर स्वप्निल वंडणारे उपस्थित होते.
अकॅडेमी चे प्राध्यापक वाल्मिक बिलसोरे यांनी प्रास्ताविकात भविष्यात खान्देशी रक्षक गृप च्या सोबतीने मोठं काम उभं करण्याचा मानस बोलून दाखवला तर अकॅडेमी चे संचालक, प्रा.भूषण पाटील सर यांनी युवकांनी कमी शुल्कात मिळणाऱ्या या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा असे सांगितले
यावेळीं, प्रा.अनंत बागुल,प्रा.हर्षल पाटील प्रा.भूषन जगताप भूषण सुर्यांशी उपस्थित होते .
सुत्रसंचलन प्रवीण पाटील यांनी केले

