भारतीय सैन्यदलाचा गणवेश बदलणार

0

नवी दिल्ली :- भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असणारे सर्व जवान व अधिकारी येत्या काळात नव्या गणवेशात दिसण्याची चिन्हे आहेत. आर्मी युनिफॉर्म मध्ये कोणते कोणते बदल केले जाऊ शकतात यासंदर्भात भारतीय लष्कराच्या मुख्यालयातून सर्व जवानांना आणि अधिकाऱ्यांना सूचना देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यात भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचा युनिफॉर्म बदलण्यासंदर्भात चर्चा झाली. हा युनिफॉर्म अधिक स्मार्ट आणि आरामदायी करण्यावर भर दिला जाणार आहे. मिळलेल्या वृत्तानुसार माहितीनुसार, अन्य देशांप्रमाणे शर्ट आणि पॅन्टचा कलर वेगवेगळा ठेवण्यात यावा अशी सूचना देखील करण्यात आली आहे. सध्या भारतीय लष्करातील युनिफॉर्ममध्ये खांद्यावर एका पट्टीवर लावण्यात आलेल्या स्टारमुळे संबंधित अधिकाऱ्याची रॅक लक्षात येते. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लष्कारच्या युनिफॉर्मवर छातीवर स्टार लावले जातात. भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचा रॅक देखील अशाच प्रकारे दाखवली जावी अशी सूचना देखील आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.