भारतीय रेल्वेकडून प्लॅटफॉर्मसह प्रवाशी गाड्यांच्या तिकीटात वाढ

0

मुंबई : भारतीय रेल्वेकडून आपल्या नेटवर्कवर प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रेल्वेच्या ताज्या अधिसूचनेनुसार प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत १० रुपयांवरून ३० रुपयांवर नेण्यात आली आहे. सोबतच, लोकल रेल्वेच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. १० रुपयांना मिळणारं तिकीट यापुढे ३० रुपयांना मिळणार आहे.

 

फेब्रुवारी महिन्यात कमी अंतराच्या प्रवाशांच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर आता ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात येतेय. करोना काळात अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी ‘किंचित भाडेवाढ’ केल्याचं स्पष्टीकरण यावेळी रेल्वे प्रशासनानं दिलं होतं.

 

यापूर्वी रेल्वेकडून १ जानेवारीपासून उपनगरी गाड्या वगळता इतर रेल्वेच्या भाड्यात वाढ केली होती. यामुळे, उपनगरी भाड्यांचे दर बदललले नसले तरी सामान्य बिगर-एसी, बिगर-उपनगरी रेल्वेच्या भाड्यात प्रति किमी प्रवासासाठी १ पैसा वाढ झाली होती. त्यानंतर रेल्वेकडून मेल, एक्स्प्रेस नॉन-एसी रेल्वे गाड्यांच्या भाड्यात दोन पैसे प्रती किमी तसंच एसी वर्गांच्या भाड्यात चार पैसे प्रती किमी वाढ जाहीर करण्यात आली होती.

 

करोना लॉकडाऊन काळात रेल्वेकडून काही विशेष रेल्वेंची संख्या वाढवण्यात आली आहे. सुरुवातील लांब पल्ल्याच्या गाड्यांनंतर कमी अंतराच्या प्रवासी गाड्याही ‘विशेष रेल्वे’ म्हणून रुळावर परतल्या आहेत. ही भाडेवाढ शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या प्रीमियम गाड्यांनाही लागू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.