भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव ग्रामीण व शहर जिल्हा बैठक भडगाव येथे उत्साहात संपन्न

0

भडगाव | प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाची जळगाव ग्रामीण व शहर जिल्हाची बैठक आज दि. 23 रोजी  भडगाव येथे नारायण मंगल कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश प्रभारी संजय कौडगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर खा. उन्मेष पाटील, भाजपचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, भाजयुमो ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, प्रदेश चिटणीस गीतांजली ठाकरे, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, सरचिटणीस राकेश फेगडे, आनंद सपकाळे, जितेंद्र चौथे, भडगाव तालुकाध्यक्ष  सोमनाथ पाटील, तालुका सरचिटणीस अनिल पाटील, सुरेश परदेशी उपस्थित होते .

यावेळी मार्गदर्शन करतांना संजय कौडगे यांनी, युवा मोर्चाने १ जुलै ते १ ऑगस्ट २०१९ दरम्यान नवमतदार नोंदणी अभियान राबवायचे आहे. यासाठी जिप गट, पंस गण, प्रभागनिहाय तसेच बुथ स्तरापर्यंत जबाबदारीचे वाटप करायचे आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २५ हजार नवीन मतदार नोंदणी करायची असे सांगितले.

याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस तथा जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खा. उन्मेष दादा पाटील आणि भाजपा जळगाव ग्रामीण चे नवनियुक्त प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांचा सत्कार युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करतांना खा. उन्मेषदादा पाटील म्हटले की, युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रिय व्हावे तर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून    समन्वयाने काम करावे. कार्यकर्त्यांनी, आगामी विधानसभा निवडणुकीत एकजुटीने काम करावे असे सांगितले.

यावेळी जळगाव जिल्हयातील युवा मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीचे नियोजन तालुकाध्यक्ष नितीन महाजन, प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शेखर बच्छाव, मुकेश महाजन, सचिन पाटील, मच्छिंद्र शार्दूल,नकुल पाटील, रुपेश खैरनार, शुभम सुराणा यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.