भारताविरूध्दच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर

0

वेलिंग्टन : आॅस्ट्रेलियाविरूध्दची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौ-यावर जाणार आहे. या दौ-यात भारतीय संघ पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

यातील पाच टी-२० सामन्यांची मालिका २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणार असून यासाठी न्यूझीलंड संघ जाहीर करण्यात आला आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि ल्युकी फर्ग्युसन यांना टी-२० मालिकेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघात गोलंदाज हॅमिश बेन्नेटचा संघात समावेश करण्यात आला आहे. बेन्नेट जवळपास अडीच वर्षानंतर संघात पुनरागमन करणार आहे.न्यूझीलंडचा टी-२० संघ पुढीलप्रमाणे : केन विल्यमसन (कर्णधार),हॅमिश बेन्नटे, टाॅम ब्रुस, काॅलीन डीग्रँडहोम, मार्टीन गप्टील, स्काॅट, डार्ली मिचेल, काॅलिन मुर्नो, राॅस टेलर, ब्लर टिस्कनर, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, इश सोधी, टीम साउदी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.