‘भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही’; काँग्रेस नेत्याचे थेट आव्हान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नवी दिल्ली 

काँग्रेस नेत्याने भारताला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही, असे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहांना आव्हान दिले आहे.  आगामी वर्षात निवडणुका होणार आहेत. दरवेळी प्रमाणे यंदाही जाती-धर्माचे राजकारण केले जात आहे. एकीकडे भाजपकडून हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केले जात आहे.

तेलंगणातील काँग्रेसचे नेते राशीद खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांवर हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवरुन निशाणा साधलाय.तसेच, भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे आव्हानही दिले आहे.

‘मी जिवंत असेपर्यंत भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, आणि बजरंग दल हे त्यांचे हिंदू राष्ट्र घडवण्याचे स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाहीत. मी भारताला कधीही हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही’, असे राशीद खान म्हणाले. तसेच, मुस्लिमांना पाठिंबा देणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

राशीद खान यांनी यापूर्वी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आणि हिंदू धर्म स्वीकारलेल्या वसीम रिझवी म्हणजेच आताचे जितेंद्र नारायण त्यागींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. वसीम रिझवींनी 6 डिसेंबर रोजी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. यासोबतच त्यांनी आपले नाव बदलून जितेंद्र नारायण सिंह त्यागी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here