भारताने इराणमधून तेल आयात करणे थांबवावे – अमेरिका

0

वॉशिंग्टन : भारत आणि इतर देशांनी इराणकडून नोव्हेंबर पासून तेलाची आयात थांबवावी, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. यामध्ये भारत आणि चीन इराणमधून तेलाची आयात मोठ्या प्रमाणात करत आहे. ती ४ नोव्हेंबर पासून थांबवावी. यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण केल्या जातील. भारत आणि चीन इराणी तेलाचे प्रमुख आयातदार आहेत. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होऊ शकतो, असे अमेरिकन सूत्रांनी सांगितले आहे. हे ट्रम्प प्रशासनाचे इराणला एकटे पाडण्याचे धोरण आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री माईक पॅम्पो आणि संरक्षण सचिव जेम्स मॅटीज यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.