भारतात आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू ; मृतांची संख्या ५ वर

0

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. जयपूरमध्ये कोरोनामुळे एका ६९ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांची संख्या १९५ पर्यंत पोहोचली आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.राजस्थानच्या जयपूरमधील 69 वर्षांची महिला इटलीहून भारतात आली होती. तपासणी तिला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं होतं. तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतात कोरोनामुळे आतापर्यंत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 196 वर पोहोचली आहे. त्यापैकी 13 जणांवरील उपचार यशस्वी ठरलेत. हे 13 जण व्हायरसमुक्त झालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.