भारतातील कोरोना रूग्ण संख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड; एका दिवसात आढळले तब्बल इतके रुग्ण

0

नवी दिल्ली । भारतातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस अधिक वाढत चालला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. भारताच्या नावे नकोशा वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच एका दिवसात ८० रुग्ण आढळून आले आहेत. विशेष बाब म्हणजे ऑगस्ट महिन्याचा शेवटच्या आठवड्यात कोरोनाची स्थिती आणखी बिकट होत असल्याचेच आकडेवारीतून दिसून आलं आहे. देशातील रुग्णसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान,

देशात मागील काही आठवड्यांपासून ७० हजार ते ८० हजारांच्या सरासरीनं दररोज रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यानं हा दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यामध्ये रुग्णसंख्येत काहीशी घट होत असल्याचं दिसून येत असतानाच अखेरच्या आठवड्यात मात्र संसर्गाचा प्रमाण वाढल्यानं चितेत भर पडली आहे. मागील पाच दिवसांमध्ये दिवसाला ७६,००० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या आठवड्यात संसर्ग होण्याचं प्रमाण १३.१ टक्के वाढलं आहे. हे प्रमाण मागील आठवड्यातील संसर्गाच्या तुलनेत ४.७ टक्क्यांनी अधिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.