जळगाव :- भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शहरातील रेल्वे स्थानकाजवळील आज सकाळी महामानवाला अभिवादन करण्यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार आ.उन्मेष पाटील, आमदार राजुमामा भोळे, आमदार चंदूलालभाई पटेल, महापौर सिमाताई भोळे, रिपाइंचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, शिवसेनाचे मंगला बारी, सरीफाताई तडवी यांच्यासह महायुतीचे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.