Saturday, January 28, 2023

भादली येथील २३ वर्षीय तरूणीची आत्महत्या

- Advertisement -

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली येथील २३ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीला आली आहे. खूशबू गोपाळ चौधरी (वय-२३) रा. भादली असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खूशबू चौधरी हिने घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे.  गुरुवारी भादली गावातच एका लग्नसमारंभाच्या ठीकाणी तीची आई गेली होती. तर वडील शेतात गेले होते. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. कुरकुरे यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, नातेवाईकांची जिल्हा रूग्णालयात गर्दी जमली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यातअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे