जळगाव | प्रतिनिधी
भादली खु येथील गर्भवती महिलेला प्रसूती वेदना असह्य झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. हि घटना दि. १५ रोजी सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मीनाबाई अकील बारेला (वय १८, रा.भादली) असे मृत गर्भवतीचे नाव आहे. मीनाबाई हिला प्रसूती वेदना असह्य झाल्याने मंगळवारी रात्रीपासून तिची प्रकृती खालावली होती. बुधवारी सकाळी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहनाने आणत असाताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन तीला मृत घोषित केले.