निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या भातखेडे येथे दि, २1 जुलै रोजी मरी आईचा भंडारा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गावावर मरी आईची कृपा राहावी रोग राई जावून सुख समृद्धी भरभराटीचा आनंद मिळावा पावसाची कृपा दृष्टी व्हावी यासाठी गावकरी श्रावण महिन्यात सात्त्विक वरण बट्टीचे भोजन करून मरी मातेचा प्रसाद म्हणून खाण्याची प्रथा आहे.

या निमित्ताने गावातील सर्व ग्रामदेवतांची पुजा अर्चा करून बाकोळा नैवेद्य दिला जातो. यावेळी वाजत गाजत गाव मिरवणूक काढून भंडारा उत्सव साजरा केला जातो यावेळी गावातील ग्रामस्थ माता भगिनी बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित राहातात.
