भातखेडे गृप ग्रा.पं.सरपंचपदी शिवसेनेच्या आशाबाई पाटील तर उपसरपंच पदी शिवाजी पाटील बिनविरोध

0

निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या भातखेडे गृप ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच पदांची निवड दि, १२ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अध्यासी अधिकारी एरंडोल पं, समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी पंकज साहेबराव बेलदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सरपंच पदी शिवसेनेच्या सौ आशाबाई मनोहर पाटील तर उपसरपंच पदी शिवाजी माधवराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्राम पंचायत, सदस्य प्रा,सागर विरभान रायगडे दर्शन राजाराम पाटील प्रताप दगडू पाटील वाल्मिक तानाजी भिल सौ,सिमा रमेश पाटील सौ, प्रमिला किशोर पाटील सौ, जयाबाई देविदास पाटील सौ, रजनी राजेंद्र पाटील सौ, मथूराबाई अनिल भिल आदी उपस्थित होते यावेळी सरपंच उपसरपंच बिनविरोध कामी गावातील जेष्ठ श्रेष्ठ रामराव पाटील रंगराव पाटील गजानन पाटील बबनराव पाटील अशोक पाटील ज्ञानेश्रर बडगुजर अनिल पाटील विजय पाटील सोपान पाटील शांताराम पाटील सुरेश पाटील आदी ग्रामस्थांचे विषेश सहकार्य लाभले.

नवनिर्वाचित सरपंच आशाताई पाटील उपसरपंच शिवाजी पाटील यांचे आ, चिमणराव पाटील जिल्हा दुध महासंघाचे संचालक अशोक पाटील शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले एरंडोल पंचायत समिती सभापती ‌अनिल महाजन पंस सदस्य दिलीप रोकडे सर पत्रकार लक्ष्मण पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.