भातखंडे शाळेतील शिक्षक शिक्षण पोहोचवत आहेत वाडयावस्तीवर ! !

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयात कोरोनाविषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन काळापासून विद्यालयातील शिक्षक ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिक्षण अविरतपणे  देत असून राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडून शाळा बंद पण शिक्षण चालू या धोरणानुसार  विद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षण तर देतच आहेत. विद्यालयातील जेष्ठ शिक्षक  बी एन पाटील

हे नियमित व्हाट्सअप ग्रुप द्वारे शिक्षण तर देतच आहे. परंतु त्यांच्या समवेत शाळेतील सह शिक्षक एस बी भोसले त्यांच्या सोबत ते ज्या वाडी वस्तीतील गोरगरीब विद्यार्थ्यांकडे घरोघरी जाऊन शिक्षण पोहोचवण्याचा  प्रयत्न करीत आहे वाड्या-वस्त्या तील विद्यार्थ्यांकरता शिक्षण हे पोहोचले पाहिजे त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत यावर अधिक भर ते देत आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे आजही साधा मोबाईल नाही किंवा त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे साधन नाही अशा विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष विद्यार्थी व पालक भेट घेऊन त्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी समजून घेणे त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्याकडील असलेल्या शैक्षणिक साधनांमधून आपण अभ्यास करतात किंवा नाही त्यात काय अडचणी येतात इंग्रजी विषयाचा सातत्याने वाचन, लेखन व गृहपाठ नियमित करतात किंवा नाही त्याची सोडवणूक ते व्यवस्थितरित्या करतात किंवा नाही ते शैक्षणिक प्रवाहात सातत्यपूर्ण कसे राहतील यासाठी नियमित प्रयत्न करीत आहेत. आजही विज्ञान युगाच्या गप्पा गप्पा मारत असताना या आधुनिक युगात वाड्या वस्तीतील आदिवासी दलित बांधवांकडे आजही साधे फोन आधुनिक  स्मार्टफोन  पासून ते  वंचित आहेत म्हणून श्री पाटील सर नेहमीच ज्या विद्यार्थ्यांकडे साधा मोबाईल नाही आणि जे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहे आणि ह्या वाडी वस्तीतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्वत्र कौतुक होत असून पालक समाधान व्यक्त करीत आहे.शिक्षण ऑनलाइन की ऑफलाइन कसे चालू आहे आणि ते विद्यार्थ्यांना कितपत समजते आहे किंवा त्यांना किती फायदा होतो आहे हा सध्या सगळ्यांचा चर्चेचा  विषय आहे. परंतु कोरोनाकाळात शिक्षण कसं चालू आहे या पेक्षा, त्यांचं आणि पालकांचं मनोधैर्य टिकवणं, हे महत्वाचे आहे जेव्हा कधी शाळा सुरू होतील तेव्हा शिकणारी मुलं-मुली पुन्हा शाळेत येतील का ?  हे शिक्षणक्षेत्रापुढचं फार मोठं आव्हान असणार आहे हे मात्र नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.