भातखंडे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठीचे राष्ट्रीयत्वाचे व रहिवासीचे दाखले वाटप

0

भातखंडे (प्रतिनिधी)  भडगाव तहसीलच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांच्या अथक प्रयत्नातून विद्यार्थ्यांची  राष्ट्रीयत्वाचा दाखला, वयाचा दाखला यासाठी वेळोवेळी विद्यार्थी व पालकांना तहसील कार्यालयात वेळोवेळी चकरा माराव्या लागत होत्या .

हे भडगाव तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेतच वरील कागदपत्रे मिळवून दिलेले आहेत. असेच वितरण कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक आर एस पाटील  व शाळेतील शिक्षक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सदरचे दाखले वितरित करण्यात आले.  या उपक्रमाबद्दल ग्रामीण भागातील पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.