भातखंडे( प्रतिनिधी) येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयात कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉक डाऊन असल्यामुळे त्याचे तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टीने एका ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेने ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी प्रवेश करण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. नुकताच बहुतांशी शाळांनी विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल घोषित केलेला असून यासाठी विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक गुगल लिंक तयार करण्यात आलेली आहे. त्या गुगल लिंक च्या साह्याने अवघ्या पाच मिनिटाच्या आत विद्यार्थ्याचा प्रवेश हा होत असतो. यात विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव आईचे संपूर्ण नाव ,वडिलांचे संपूर्ण नाव ,विद्यार्थ्याचा आधार क्रमांक ,विद्यार्थ्यांची जन्मतारीख, यापूर्वी शिकत असलेल्या शाळेचे पूर्ण नाव, या वर्षी कोणत्या वर्गात प्रवेश हवा ,यापूर्वी शिष्यवृत्ती मिळत होती काय, मोबाईल क्रमांक, व पूर्ण पत्ता. एवढी माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यावर लगेच त्या विद्यार्थ्याचा प्रवेश होत असतो .याअगोदर ग्रामीण भागातून ही शाळा पूर्णपणे डिजीटल झालेले असून यात शाळेचे बाह्यांग पूर्ण रंग रंगोटी देऊन बोलकी चित्रे काढलेली आहेत. तसेच शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. शिक्षकांच्या बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जात असते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी दोन स्मार्ट टीव्ही शाळेत असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यूट्यूब च्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने अध्ययन अध्यापन पद्धती राबवली जात असते. शाळा अत्यंत रमणीय परिसरात असल्याने शाळेत अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवला गेल्याने संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील ,संस्थेचे संचालक प्रशांत पाटील, संस्थेच्या संचालिका डॉ.पुनम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी कौतुक केले आहे. हा अभिनव उपक्रम राबवण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक तथा तंत्रस्नेही शिक्षक बी एन पाटील यांनी ही ऑनलाइन प्रवेशाची लिंक तयार करून पालकांची सोय करून दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात या स्तुत्य उपक्रमाचा कौतुक होत आहे. नुकतीच ऑनलाईन संकल्पनेबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी , एस. सी. ई. आर. टी. चे संचालक दिनकर पाटील , राज्यातील सर्व शिक्षण अधिकारी यांची झूम ॲप च्या साह्याने मीटिंग झाली खास करून त्यांनी शिक्षकांनी तंत्रज्ञानात परिपूर्ण असले पाहिजे , दीक्षा ॲप्सचा वापर विद्यार्थी व पालकांना पर्यन्त करणे आवश्यक आहे, शिक्षकांनी पालक ,विद्यार्थी यांचेशी फोन किंवा व्हाट्सअप द्वारे सतत संपर्कात राहणे गरजेचे आहे. येथून भावी काळात प्रशिक्षण व मिटींग ऑनलाइन होतील .
अशा प्रकारचे शिक्षण क्षेत्रातील बदल हे शिक्षकांसाठी आव्हान आहे. यासाठी शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त टेक्नोसॅव्ही राहून हे बदल स्वतःमध्ये करून घेणे गरजेचे आहे .म्हणूनच अशा पद्धतीने या शाळेने देखील गुगल लिंक च्या द्वारा ऑनलाइन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.