भातखंडे प्रतिनिधी : येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत १४ वित्त आयोगातून १,३०,००० मंजूर रकमेतून दलित वस्तीत काँक्रिटीकरण आला सुरुवात झालेली असून त्याचे आज २७ एप्रिल बुधवार रोजी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच भागाबाई भिल्ल उपसरपंच उषाबाई भालेराव सह गुरुदास भालेराव ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील सह अन्य सदस्य उपस्थित होते . १४ वित्त आयोगातून मंजुरीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच भागाबाई भिल्ल, अतुल महाजन, नितीन पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील,मालूबाई पाटील,रवींद्र पाटील, रोहिदास चौधरी, सोनु पाटील,ग्रामविकास अधिकारी चंदू सोमवंशी कर्मचारी संदीप पाटील सह, व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चंद्रकांत सोमवंशी लिपिक संदीप पाटील यांनी पाठपुरावा केला काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.