भडगाव :– तालुक्यातील भातखंडे येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ तर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत खरीप बीजोत्पादन कार्यक्रम शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गावातील प्रगतशील शेतकरी श्री अर्जुन हरी पाटील आणि प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री संजय पवार सर ,नोडल अधिकारी पोकरा, जळगाव याना आमंत्रित करण्यात आलेले होते.
प्रथम मान्यवरांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री पवार यानीं पोकरा अंतर्गत हवामान अनुकूल बियाणे उत्पादन कार्यक्रम करण्यासाठी उपस्थित शेतकऱ्याना मार्गदर्शन केले.महाबीज तर्फे खरीप बिजोत्पादन कार्यक्रम घेणाऱ्या बीजोत्पादकाना पोकरा अंतर्गत एकूण बियाणे खर्चाच्या शंभर टक्के किंवा हेक्टरी कमाल १५००० रुपये असे अनुदान स्वरूपात देण्यात येईल, अशी माहिती पवार यांनी दिली,तसेच शेतकऱ्याच्या समस्यांचे निराकरण ही केले.त्यानंतर श्री एस. एस.सावरकर, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यांनी ही मार्गदर्शन केले तसेच जास्तीत जास्त बीजोत्पादकाना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.श्री फिरके ,सहायक क्षेत्र अधिकारी, श्री बी बी पाटील ,कृषी पर्यवेक्षक, श्री निलेश पाटील,कृषी सहायक, श्री गिरी कृषी सहायक या कार्यक्रमात सहभागी होते.उपस्थित शेतकरी याना अल्पोपहार व चहा देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमरसिंह जगदाळे, सहायक क्षेत्र अधिकारी, पाचोरा यांनी केले.