भातखंडे (प्रतिनिधी) भातखंडे ते गिरड हा पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून त्या रस्त्याचे अक्षरशा तीन-तेरा वाजले असून या रस्त्यावरून मौजे उत्राण शिवारातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. आणि तो वाळू उपसा अवजड वाहनातून केला जात असल्याने डांबरी रस्ता असून नसल्यासारखा झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाईप लाईनी देखील फुटल्या आहेत. तसेच या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे या सर्व कारणांमुळे एरंडोल आगारातून ये-जा करणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस बंद करण्यात येणार असल्याने यातून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. तरी या बाबत भडगाव तालुक्याचे तहसीलदार तृप्ती मॅडम यांना लेखी निवेदन देऊन समस्या मांडण्यात आलेल्या आहेत.