मुंबई :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने महाराष्ट्रात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जागेवर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची नियुक्ती झाल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहे. सोशल मीडियातून प्रा. राम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपकडून अनेक नावे चर्चेत असून या चर्चेमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव अग्रणी आहे.
भाजपकडून प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्यातील अनेक नेत्यांचा विचार केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची नावे आघाडीवर आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.प्रसारमाध्यमातून ज्या बातम्या सुरु आहेत ते केवळ संभाव्य चर्चेतील नावे आहेत.
प्रा. राम शिंदे, जलसंधारण मंत्री- महाराष्ट्र राज्य.