नवी दिल्ली : भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केली. चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भाजपचे अध्यक्षपद सांभाळतील, तर आमदार मंगलप्रभात लोढा यांनाही पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका अगोदर या दोघांनाही पक्षाच्यावतीने ही जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची पुन्हा निवड केली गेली आहे. विशेष म्हणजे याआधी प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे अशी मोठी नावं चर्चेत होती. संघाच्या जवळच्या नेत्यांकडेच प्रदेशाध्यपद द्यावं, असा संघ नेत्यांचा सूर होता. मात्र चंद्रकांत पाटील अमित शाहांच्या जवळचे असल्यानं पाटलांचीच वर्णी लागणार असल्याचं बोललं जातं होतं. त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे.

