Monday, September 26, 2022

भाजप नेत्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडूवर बलात्कार; धमकी देत ६ महिने अत्याचार

- Advertisement -

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

दिवसेंदिवस देशात महिला अत्याचारात वाढ होताना दिसून येत आहे. महिलांवरील अत्याचारात लोकप्रनिधींचे सुद्धा नावे समोर येताना दिसून येत आहे. त्यामुळे ही बाब आता गंभीर होताना दिसून येत आहे. असेच एक प्रकरण आज समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

संजय मिश्रा असे या भाजप नेत्याचे नाव असून त्यांच्याविरुद्ध पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची दखल घेत चौकशी केली त्यामध्ये पीडितेने लावलेल्या आरोपात सत्यता दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी मिश्रा यास अटक केली आहे. ही घटना झारखंड राज्यातील पश्चिमी सिंहभूम येथील आहे. संजय मिश्रा हे भाजपचे पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर  घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी व महिलेची वेगवेगळी चौकशी केली. त्यानंतर प्राथमिक चौकशीमध्ये पीडित महिलेने केलेल्या आरोपात तथ्थ पोलिसांना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. अशी माहिती चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी दिली आहे.

संजय मिश्राकडे पीडितेचा अश्लील व्हिडीओ असून तो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करत होता. तसेच त्याने पीडित महिला खेळाडूचा एक फोटो काढला होता. संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला एका स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिचे लैंगिक शोषण करत होता. पोलिसांना या आरोपात सुद्धा सत्यता आढळून आली आहे.

ही घटना समोर येताच संजय मिश्रा यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची ही चाल असल्याचे मिश्रा याने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. माझ्यावर बलात्काराचा आरोप होणं हे विरोधकांनी रचलेलं घृणास्पद षडयंत्र आहे. माझा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासावे. तसेच आरोपात ज्या हॉटेलचा उल्लेख करण्यात आला त्या हॉटेलातील 3 एप्रिलचे रजिस्टर तपासावे, तसेच सीसीटीव्ही पाहावेत. असे मिश्रा याने व्हिडिओत सांगितले आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या