भाजप देणार प्रज्ञासिंहऐवजी नवा उमेदवार?

0

भोपाळ :मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादात सापडलेली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरची भाजपने त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा विचार सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपचे विद्यमान खासदार आलोक संजर यांनी मंगळवारी आपला अर्ज सादर केल्याने या चर्चेला ऊत आला आहे. निवडणूक आयोगाने प्रज्ञा सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्याने भाजप नेते अडचणीत आले आहेत. मात्र प्रज्ञा सिंह यांनी आपला दुसरा उमेदवारी अर्जही सादर केला. त्यावेळी भाजपचा एकही नेता त्यांच्याबरोबर नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.