भुसावळ –
भाजपचे उमेदवार यांच्या अमळनेर येथील बहुचर्चित व वादग्रत प्रकरणानंतर रावेर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार विद्यमान खा रक्षा खडसे यांच्या प्रचाराकरिता जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ आज दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास प्रथमच भुसावळ येथे आले यावेळी .रावेर लोकसभा मतदार संघ महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचार कार्यालयास उदय वाघ यांनी भेट दिली व पदाधिकारी व कार्यकर्त्यारना प्रचंड मताधीक्क्याने विजयी करण्याचे आवाहन करीत मार्गदर्शन केले .
प्रसंगी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यावेळी म्हणाले की कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करायचे आहे आपल्या करीता प्रत्येक जागा महत्वची आहे देशाचे रक्षण करणारे नेतृत्व म्हणून पुन्हा मोदीं यांना निवडून आणायचे आहे याकरिता सर्वानी एकमताने कार्य करा असे आवाहन वाघ यांनी केले.
यावेळी कार्यालयात प्रा डॉ सुनील नेवे , भाजप शहर अध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, रमेश नागराणी, दिनेश नेमाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.