घोड्यावर मिरवणूक काढत स्वागत, सभेला अभूतपूर्व प्रतिसाद
चाळीसगाव प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्यामार्फत खेडगाव, बहाळ, न्हावे, ढोमने, तरवाडे व इतर भागांना जोडणारे रस्ते आमदार असतानाच्या काळात केले. त्याचबरोबर तालुक्याला एका वेगळ्या दिशेने नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुती सदैव प्रयत्नशील राहिल, त्याच विविध कामांमुळे जनता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहील असे प्रतिपादन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केले.
खेडगाव-बहाळ गटाच्या विजय संकल्प मेळाव्यात बहाळ येथे केले. महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळावा आयोजित केलेला होता.
शुक्रवार (दि.11) सकाळ पासून कोदगाव, बेलदार वाडी, गणपुर गाव व तांडा, रामवाडी, चितेगाव, पिंप्री ब्रू., गणेशपुर, शिंदी, ओढरे, विष्णुनगर, खडकी ब्रु., खरजई, तरवाडे येथून प्रचार दौरा करत बहाळ येथे विजय संकल्प मेळाव्यात या दिवासाच्या प्रचार दौर्याची सांगता करण्यात आली.
पुढे खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, जे लोक महात्मा फुले यांच्या नावाने मत मागतात त्यांनी महात्मा फुले यांची अस्मिता जोपासण्यासाठी कुठली पाऊले उचलली. भारतीय जनता पक्षाच्या काळात महात्मा फुले यांच्या नावाने ट्रामा केअर सेंटर चे लोकार्पण करून त्यांची अस्मिता जोपासण्याचे काम आम्ही केलेले आहे. येणार्या काळात या शिवारातील शेतकर्यांना मुबलक प्रमाणात पाण्याची सोय व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सात बंधार्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल. एकेकाळी प्रत्येक घराघरात सतत खंडित होणारा वीज पुरवठा आम्ही नियमित सुरू केला, येणार्या काळात आता शेतातील वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात उत्तम कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांचे हात पुन्हा बळकट करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या मेळाव्याला खासदार उन्मेश दादा पाटील, शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, तालुका अध्यक्ष के.बी. दादा साळुंखे, मार्केट कमिटी सभापती रवी आबा पाटील, पंचायत समिती सभापती स्मितलताई बोरसे, उपसभापती संजू तात्या पाटील,
शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील,आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद जी खरात ,ज्येष्ठ नगरसेवक राजू अण्णा चौधरी , यु.डी.माळी सर, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती महेंद्र पाटील,शिवसेना तालुका प्रमुख नानाभाऊ कुमावत,
माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, शेषराव पाटील,
धर्मा आबा वाघ, संजूआबा पाटील, किशोर पाटील ढोमणेकर, जगन महाजन, दिनेशभाऊ बोरसे, रवींद्र चौधरी, रमेश सोनवणे,
अनिल गायकवाड, पियुष साळुंखे, सरदार शेठ राजपूत व पदाधिकारी – कार्यकर्त्यांच्या सुष्म नियोजनात हा मेळावा विक्रमी गर्दीत संपन्न झाला.