भाजपा युवा नेत्याचा, मराठी शाळेमागील बनावट दारूच्या कारखाना केला उद्ध्वस्त

0

चाळीसगाव पोलीसांची कामगिरी

चाळीसगाव –
चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस मनोज साबळे या नेत्याचा बनावट दारू बनवण्याच्या कारखान्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी व ग्रामीण पोलीस कर्मचार्‍यांच्या संयुक्त पथकाने संयुक्तपणे छापा टाकून दोन लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून दोन जण घटनास्थळापासून पलायन करण्यास यशस्वी झाले याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे मराठी शाळा वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागे बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख यांना मिळाली त्यावरून त्यांनी ग्रामीण पोलिसांना सोबत घेऊन पथक तयार केले व करजगाव येथील शाळेच्या पाठीमागे मनोज शरद साबळे या या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकली असता घटनास्थळावरून पोलिसांना बनावट देशी दारूचे 79 बॉक्स बनावट दारू तयार करण्याचे स्पिरिट बॉटल पॅकिंग करण्याचे मशीन रसायन असे एकूण दोन लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळावरून मनोज शरद साबळे व विनोद जिभाऊ पवार या दोघांना ताब्यात घेऊन अटक अटक केली व घटनास्थळावरून मनोज मांडगे व मनोज राजपूत हे दोघं त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यास यशस्वी झाले त्यांचा शोध पोलीस घेत आहे याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूराव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वरील आरोपींविरुद्ध भादवि कलम 328 34 व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक जगदीश मुलगीर हे करीत आहे.
****चाळीसगाव तालुक्यात अधिकारी त्रस्त , गुन्हेगार, गुटखा वाळू तस्कर, गांजा तस्कर, बनावट दारू तयार करणारी टोळी मस्त,***
चाळीसगाव तालुक्यात गेल्या साडेचार वर्षांपासून अवैद्य धंदेवाल्यांनी उच्छाद मांडला आहे अवैद्य गुटखा तस्कर, अवैद्य वाळू तस्करी, वाळू त्याचबरोबर नुकताच जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चाळीसगाव येथे मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी करताना पकडले ,परंतु त्या गांजा तस्करी मागील मुख्य सूत्रधार चाळीसगाव नगरपालिकेचे काही नगरसेवक सुद्धा गुंतले असल्याची चाळीसगावात चर्चा आहे परंतु अजूनही जिल्हा शाखेचे पोलीस मुख्य सूत्रधार पर्यंत पोहोचत नाही .याचे ही आश्चर्य चाळीसगाव करांना वाटते आहे .त्याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यात मागील काळात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना हैदर नावाच्या इसमाचा मागील काळात पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता परंतु त्या वेळेस सुद्धा पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झालेत,हिंगोणे अवैध वाळू चोरी प्रकरणी, तहसीलदार गेलेत पुढे काय ? त्याचप्रमाणे नुकताच चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे भारतीय जनता पार्टीचा युवा नेता मनोज साबळे याच्याकडे सुद्धा बनावट दारू तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला परंतु या सर्व प्रकारांना मागील नेमके मुख्य सूत्रधार कोण ?आणि पोलीस या सर्व अवैद्य धंद्या वाल्यावर थातूर मातुर कारवाई करून का सोडून देते ,याबाबत ाळीसगाव तालुक्यात राजकीय ,सामाजिक वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे, चाळीसगाव येथे काम करताना प्रशासकीय अधिकारी मेथ्याकूटीस आले आहे ,त्यांना सरकारमधील अनेक हस्तक्षेपात काम करावे लागते त्यामुळे मागील काळात अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्य खोट्या केसेस बळी पडले त्यामुळे चाळीसगाव तालुक्यात एकच चर्चा ऐकायला मिळते प्रशासकीय अधिकारी त्रस्त व अवैध धंदेवाले मस्त.

Leave A Reply

Your email address will not be published.