भाजपा मंत्र्यानी हुज्जत घातल्याने निवडणूक अधिकारी हेलिकॉप्टर न तपासताच फिरले परत

0

नवी दिल्ली – पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्यास आलेल्या पथकातील पोलीस व अधिकाऱ्यास भाजप मंत्र्यांनी हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अधिकारी हेलिकॉप्टर न तपासताच परत फिरले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेलिकॉप्टर तपासल्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले होते.

मंगळवारी ओडिशातील संबलपूर येथे पोहोचल्यानंतर प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी, प्रधान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे मागितली. तसेच या पथकातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. विशेष म्हणजे, प्रधान यांच्या अशा वागण्यामुळे अधिकारी हेलिकॉप्टर न तपासताच परत फिरले. अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केली, नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे प्रमुख नवीन पटनाईक यांच्याही हेलिकॉप्टरवर भरारी पथकाने धाड टाकली आहे. त्यामध्ये पटनाईक यांनी भररी पथकाला संपूर्ण सहकार्य करत, हेलिकॉप्टरची तपासणी करू दिली. राऊरकेला येथे पटनाईक येथील निवडणूक रॅलीदरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.