भडगाव | प्रतिनिधी
भाजपच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा उदय वाघ यांनी राजीनामा दिल्या नंतर आज दि 22 रोजी मुंबई येथे पार पडलेल्या भाजपच्या प्रदेश बैठकीत जळगाव जिल्हा दुध संघाचे विद्यमान संचालक तथा माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष डाॅ संजिव पाटील यांची “भाजपा जिल्हाध्यक्ष” म्हणून निवड घोषित करण्यात आली आहे . मुंबई येथे प्रदेश बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे-पाटील, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, हरिभाऊ बागडे, ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री विनोद तावडे, प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत प्रदेश सरचिटणीस सुरजित ठाकूर यांनी ही निवड घोषित केली . निवडी नंतर बैठकीत डॉ संजीव पाटील यांचा मंत्री रावसाहेब दानवे, यांच्यासह जळगाव जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री गिरशभाऊ महाजन, संघटनमंत्री किशोरभाऊ काळकर, खा.उन्मेष पाटील, खा रक्षताई निखिल खडसे , खा भारती पवार , आ. राजुमामा भोळे, आ. संजय सावकारे , आ हरिभाऊ जावळे, आ चंदुलाल पटेल, शिक्षण सभापती पोपट भोळे , सुनील नेवे, दीपक सूर्यवंशी, सुरेश परदेशी आदींनी सत्कार केला.
भाजपच्या वतीने जुन्या कार्यकर्त्याला न्याय देऊन समतोल साधत डॉ संजीव पाटील यांची भाजपा जिल्हा अध्यक्षपदी नेमणूक झाल्या नंतर भडगाव, पाचोरा तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी वतीने एकच जल्लोष केला . यानिवडीची बातमी माहिती होताच डॉ संजीव पाटील यांना जिल्हा व राज्य भरातून शुभेच्छाचा वर्षाव झाला . अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ संजीव पाटील यांनी भडगाव तालुका माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज सांभाळले आहे . सध्या ते जळगाव जिल्हा दूध संघाचे विद्यमान संचालक , भाजपा जिल्हा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष व तालुका समन्वय समिती अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत . त्यांनी ग्रामीण भागात पक्ष संघटनेत योगदान दिले आहे . आरोग्य, सामाजिक, संस्कृती क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले असून आंचळगाव सह पाचोरा भडगाव तालुक्यात येथे दोन हजार वृक्षरोपण केले आहे, आंचळगाव हे गाव ग्रीन व्हिलेज तयार करण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू आहे . आरोग्य क्षेत्रात गरजूंना मोफत उपचार सेवा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सांस्कृतिक, शैक्षणिक पुरस्कार विविध स्पर्धा घेण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे.
प्रतिक्रिया :- अनेक वर्षांपासून पक्षाचे काम पहात आहे . पक्षाने व पक्षश्रेष्ठींनी दिलेली संधीच पक्षासाठी सोन करेल. पूर्ण वेळ सक्रिय पणे काम करून पक्षाला वेळ देणार आहे . पक्षश्रेष्ठींनी सर्वत्र भाजपमय वातावरण निर्माण केले आहे. यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरशभाऊ महाजन, किशोरभाऊ काळकर आदी जेष्ठपक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ काम करणार आहे .