Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»भाजपाने महावितरणसमोर केली विज बिलांची होळी
    महाराष्ट्र

    भाजपाने महावितरणसमोर केली विज बिलांची होळी

    By July 20, 2020No Comments59 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगाव ( प्रतिनिधी) :-  लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे, वाढविलेले वीज दर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज दि.२० जुलै रोजी भारतीय जनता पाटीच्या वतीने स्थानिक एमएसईबी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करुन विज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

    कोरोना संकटाच्या काळातही वीज वितरण कंपन्यांकडून ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलामुळे परिसरातील लोकांची नाराजी वाढू लागली आहे. संपुर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सर्व छोट्या मोठ्या व्यावसायीकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली होती. अशा परिस्थिती कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर असतानाच राज्य सरकारने तुघलकी निर्णय घेऊन ३ महिन्याचे सामायिक वीज बिले देण्यता आले. विज वितरण कंपनीव्दारे नागरिकांना अव्वाच्या सव्वा विज बिले रिडींग न घेता देण्यात आली आहेत. यावेळी वीज वितरण कंपनीव्दारे ४० पैसे ते १ रु. प्रती युनिट एव्हढी अन्यायकारक भाव वाढ करण्यात आली. कोरोना परिस्थितीमध्ये ही दरवाढ करणे हे सामान्य जनतेवर अन्यायी करणारी असून अवास्तविय आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना ही वाढीव विज बिले भरणे शक्य नाही. वाढीव विज बिला संदर्भात नागरीक एमएसईबी कार्यालयात जातातात तेव्हा त्यांना उध्दव वागणूक दिली जाते.

    या सर्व बाबीचा विचार करुन  सोमवारी भारतीय जनता पार्टी खामगाव शहरच्या वतीने आमदार आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात तिव्र निदर्शने करुन वाढीव विज दर रद्द करा, वीज बिले माफ करा आदी घोषणा देत निदर्शने करण्यता आली सोबत वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदन देवून नागरिकांच्या तक्रारी समजून घेवून त्यांना सोडविण्यात याव्या तसेच आदी बाबत चर्चा करण्यात आली.

    या आंदोलनामध्ये भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहर अध्यक्ष चंद्रशेखर पुरोहीत, नगराध्यक्षा सौ.अनिता डवरे, नगरसेविका सौ.शिवानी कुळकणी, नगरसेवक हिरालाल बोर्डे, नगरसेवक सतीषअप्पा दुडे, राजेंद्र धनोकार, संजय शिनगारे, महेंद्र रोहणकार, जितेंद्र पुरोहीत, वैभव डवरे, गणेश माने, रुपेश खेकडे, राम मिश्रा, पवन गरड यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif