ना. गुलाबराव पाटलांनी सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाची उडविली खिल्ली
नाशिक : आमच्याशी एकदा कुस्ती लावून बघा, मग सेनेची शक्ती समजेल. आम्ही भाजपच्या बंडखोरांसमोर कुस्ती खेळूनच निवडून आलो आहोत, असं म्हणत शिवसेनेचे पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाची खिल्ली उडविली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.30) नाशिकमध्ये विभागातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी जळगावचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील उपस्थित.
भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेचा घात केला असून ’मातोश्री’ची शक्ती क्षीण केल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना ना पाटील म्हणाले, भाजपने ३० वर्षे शिवसेनेच्या याच शक्तीचा वापर करुन सत्ता उपभोगली. त्यामुळे ‘मातोश्री’विषयी बोलण्याचा त्यांना आता अधिकार राहिलेला नाही. आमच्याशी एकदा कुस्ती लावून बघा, मग सेनेची शक्ती समजेल. आम्ही भाजपच्या बंडखोरांसमोर कुस्ती खेळूनच निवडून आलो आहोत, असे सांगत त्यांनी मुनगंटीवार यांच्यावर पलटवार केला.