जामनेर(प्रतिनिधी):- ना.गिरीष महाजन यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेवत व तालुक्यात होत असलेल्या विकास कामांच्या जोरावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांची इंकमिंग सुरूच असून काल दि.11 रोजी तालुक्यातील राहेरा-कासली ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सरपंच झिपरु तडवी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी ना.गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यात बाबू तडवी,रमजान तडवी,माणखा तडवी,गुलाब तडवी,शकील तडवी,आपसर तडवी,कुदबुद्दीन तडवी,कबीर तडवी,शेमशुद्दीन तडवी,यांचा समावेश असून कासली येथील भाजपाचे सरपंच सुभाष पाटील यांनी प्रवेश घडवून आणला असल्याचे माजी सरपंच झिपरु तडवी यांनी सांगितले आहे. गावाच्या सर्वांगिण विकासाकरिता आम्ही प्रवेश केल्याचे ते म्हणाले.