भाजपातर्फे बोदवड येथे महाविकास आघाडी सरकारचा निषेध

0

बोदवड – कोरोना महामारीच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिले आली.संपूर्ण राज्यात लाँकडाऊनमुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठ- मोठ्या विज बिलांचा शाँक दिला.याबाबत जनाक्रोश निर्माण झाल्यानंतर विज बिलात सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनीं जाहीर केले होते.मात्र आता महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिलात कुठलाही दिलासा मिळणार नाही व नागरिकांना वीज बिल भरावे लागतील असे स्पष्ट सांगितले आहे.दुसरी कडे महावितरण सक्तीने बिले वसूल करत आहे.महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.त्यामुळे दिलेला शब्द सरकारने पाळावा.अन्यथा सरकारला सत्तेच्या धुंदी तुन जागे करण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी भविष्यात संपुर्ण राज्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देत दि.२३ सोमवार रोजी बोदवड तहसीलदार हेमंत पाटील यांना बोदवड तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आहे.

निवेदन देतेवेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते अनंत कुलकर्णी,तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील,सरचिटणीस भगतसिंग पाटील,सुधीर पाटील,अमोल शिरपूरकर,राजू टापसे,सोपान ताठे,दिलीप घुले,विठ्ठल चौधरी,सौरभ हिवराळे,समाधान माळी,प्रविण भोई यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.