इंदूर : भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेतील अधिकाऱ्याला चक्क क्रिकेट बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इंदुर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक जुन्या व पडण्याची शक्यता असलेली घरं पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी आकाश विजयवर्गीय हे त्यांच्यावर धावून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आकाश यांना अटक करण्यात आली.
स्थानिक रहिवासी घर पाडण्याच्या विरोधात आंदोलन करीत होते. आमदार आकाशही आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शाब्दिक चकमक झाल्यानंतर आकाश यांनी क्रिकेटची बॅट घेऊन मोबाइलवर बोलत असलेल्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या समर्थकांनीही अधिकाऱ्याला मारहाण केली.
आकाश विजयवर्गीय हे या अगोदर देखील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. ते सध्या इंदुर-३ विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. तर त्यांचे वडिल कैलाश विजयवर्गीय हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. शिवाय पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणुन त्यांच्यावर जबाबदारी आहेत.
#WATCH Madhya Pradesh: Akash Vijayvargiya, BJP MLA and son of senior BJP leader Kailash Vijayvargiya, thrashes a Municipal Corporation officer with a cricket bat, in Indore. The officers were in the area for an anti-encroachment drive. pic.twitter.com/AG4MfP6xu0
— ANI (@ANI) 26 June 2019