भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी घेतले मुक्ताबाई समाधीचे दर्शन

0

 मुक्ताईनगर :  भारतीय  जनता पक्षाचे राष्ट्रीय  प्रवक्ते माधवजी भंडारी यांनी कोथळी येथील संत मुक्ताबाई चरणी पाद्यपूजा आरती करून दर्शन घेतले.काल जळगाव  येथे कामानिमित्त आले असता संत मुक्ताबाई दर्शनाची आस लागल्याने आज सकाळीच  मुक्ताई समाधीस्थळावर आलो.वारकरी संताचे विचारांची समाजाला आज नितांत गरज आहे.

संत मुक्ताबाई दर्शनाने मिळालेली ऊर्जा मानसिक प्रेरणा देते असे भावोत्कट विचार मांडले.संत मुक्ताबाई मंदीर समाधीस्थळाचे बांधकाम व परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. संस्थानचे वतिने व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे ,पुजारी विनायकराव व्यवहारे यांनी माधव भंडारी यांचा शाल श्रीफळ,मुक्ताबाई प्रतिमा,ग्रंथ देवून सन्मान केला.यावेळी  खासदार रक्षाताई  खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओचे डाॅ. राजेंद्र  फडके,अशोकभाऊ कांडेलकर,चंद्रकांत भोलाने,उपस्थित  होते.

Leave A Reply

Your email address will not be published.