चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी, विजय रामदास चौधरी, संजय रामदास चौधरी, राहुल राजेंद्र चौधरी, गौरव राजेंद्र चौधरी, विजय चौधरी राहणार सर्व चाळीसगाव यांच्यावर आज चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याची फिर्याद मिनाबाई अविनाश पाटील यांनी दिली असून वरील या फिर्यादी मध्ये वरील आरोपींनी त्यांचे देवकर मळा समोर चालू असलेल्या अपार्टमेंट बांधकामाच्या ठिकाणी मजुरांसाठी तात्पुरती लघुशंकेसाठी केलेल्या व्यवस्थेत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या बॅनरचा उपयोग केला आणि हे बॅनर मुतारीच्या आडोशासाठी लावलं असल्यामुळे छत्रपतींच्या फोटोचे विटंबना केले म्हणून याचा जाब विचारायला गेले असता वरील सर्व आरोपींनी तलवार, लाकडी दांडा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले म्हणून या गंभीर गुन्ह्याची ची नोंद चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली असून या सर्व परिस्थितीवर चाळीसगाव विभागाचे विभागीय अधिकारी श्री कैलास गावडे साहेब लक्ष ठेवून आहेत.
या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शन खाली अॆ पी आय रोही साहेब करीत आहेत.