पारोळा (प्रतिनिधी) : आज रोजी भाजपा सोशल मिडिया मंडल संयोजक व सहसंयोजक यांची zoom अँप द्वारे बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप सोशल मिडिया जळगाव ग्रामीण संयोजक श्री.गणेश माळी यांचे अध्यक्षतेखाली भाजपा आगामी काळात पक्षा तर्फे राबविले जाणारे कार्यक्रम बद्दल माहिती दिली. सदर बैठकीस राहुल चौधरी, अनिल बडगुजर, राहुल पाटील,शुभम सुराणा, मिलिंद वाणी,अशोककुमार लालवाणी,बाजीराव अहिरे,ज्ञानेश्वर तायडे,सोहन मोरे,अक्षय भोसले,कुणाल कोल्हे व सर्व मंडल संयोजक सह संयोजक उपस्थित होते.या प्रसंगी सर्व मंडल संयोजक यांची ओळख करून घेण्यात आली व प्रत्येकाच्या काही आळीअळचणी जाणुन घेण्यात आल्या तसेच कधी काही ही अडचण आल्यास जिल्हा सोशल मिडीया प्रमुख गणेश माळी यांच्याशी संपर्क करून आपल्या अडचणी सांगाव्यात याची त्वरीत दखल घेतली जाईल अशी ग्वाही जिल्हा प्रमुखाच्या वतीने देण्यात आली,