भाजपला खिंडार; पवारांच्या उपस्थितीत 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत भुसावळमध्ये भाजपच्या 21 नगरसेवकांनी  राष्ट्रवादीत प्रवेश केला. म्हणून पुन्हा एकदा एकनाथराव  खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिला.

एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसेंनी आधी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत राजकीय रणनीती आखली, त्यानंतर भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.

भुसावळमध्ये भाजपला एकनाथराव  खडसे यांनी भाजपला खिंडार पाडत 21 नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले.  त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का बसला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे  टोला देत म्हणाले की,  जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही. एकनाथराव  खडसे यांनी चाळीस  वर्षे भाजपसाठी काम केले, एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत आल्याने आनंद झाला, आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांच्या हस्ते विविध मागण्यांचे आणि संघटनेचे एकत्रित निवेदन अजित पवार यांच्याकडे दिले. जळगाव जिल्ह्यात सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा आपण मार्ग काढू असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला असता तर बरं झाले असते, जळगाव जिल्ह्यात आज परिस्थिती वेगळी असती, जळगावात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे, खडसे आधी आले असते तर पूर्ण जिल्हा आपला असता, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.