Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»भाजपला आणखी एक धक्का ; जयसिंगराव गायकवाडांचा राष्ट्रवादीत प्रवेश
    राजकारण

    भाजपला आणखी एक धक्का ; जयसिंगराव गायकवाडांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    By November 24, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता भाजपला आणखी धक्का बसला आहे. मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पटली यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड  भाजपमधून बाहेर पडले होते.

    मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून जयसिंगराव गायकवाड यांची ओळख आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजपच्या तिकीटावर जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. परंतु भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी मागे घेतलीच, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.

    बऱ्याच वर्षांपासून पक्षनेतृत्त्वाकडून माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मला आमदारकी किंवा खासदारकी नको होती. मला केवळ पक्ष मजबूत करण्यासाठी काम करायचे होते. जवळपास गेल्या 10 वर्षांपासून मी नेतृत्त्वाकडे याबाबत मागणी करत होतो. अनेकवेळा वरिष्ठ नेत्यांना ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केले, फोन केले. मात्र, तरीही पक्षाने आपल्याला संधी दिली नाही. सातत्याने होणाऱ्या या उपेक्षेला कंटाळूनच आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केले होतं.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…

    October 12, 2026

    आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!

    October 12, 2026

    व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif